सभासदांच्या विश्वासाने व साथीने संस्था दरवर्षी सातत्याने ऑडिट वर्ग 'अ' मिळवत आली आहे.
संस्थेचा आलेख उत्तरोत्तर चढता ठेवत असतांनाच सभासदांच्या दैंनदिन आर्थिक गरजा उत्कृष्ठपणे पुरवत आहे.
कर्ज सुरक्षा विमा योजनेची अंमलबजावणी जुलै २००८ पासून सुरु करण्यात आलेली आहे.
विद्यार्थी गुणगौरव तसेच विविध सामाजिक संदेश देणाऱ्या मार्गदर्शक शिबीर व जाहीर व्याख्यानांचे आयॊजन.
सहकार चळवळ ही मूलतः जनतेच्या प्रयत्नावर आधारलेली आहे. सहकारी तत्वावर चालू असलेल्या संस्थांना आर्थिकपेक्षा एक वेगळी अशी सामाजिक बाजूही आहे. साहाय्याची तीव्र गरज असणाऱ्या अधिकाधिक लोकांना आपल्या पंखाखाली घेऊन त्यांचे पर्यायाने समाजाचे जिवन उन्नत करणे हीच खरी सहकारी चळवळीची नीती आहे.
सहकारी व्यवसायातून वाढलेले उत्पन्न शक्य तितक्या जास्त क्षेत्रात वाटले जाते. जेणेकरून खऱ्या अर्थाने समाजवादी समाजरचनेचा उद्देश साध्य होतो. सामान्य कामगारांचा चेहरा डोळ्यासमोर ठेऊन विश्वासाने, सहकाराच्या प्रेरणेतून व आदर्शातून संस्थेने आपल्या सभासदांच्या सेवेची व सामाजिक कार्याची यशस्वी ४३ वर्षे पूर्ण केलेली आहेत.