सार्वजनिक बांधकाम कर्मचारी सहकारी पतसंस्था पुणे मध्ये आपले सहर्ष स्वागत ...
गेल्या ५० ते १०० वर्षात सहकार चळवळ प्रगत झाली आहे. खरे पाहिल्यास सहकार चळवळ विचारवंतापासून त्या चळवळीची ज्याला खरी गरज आहे त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. हेच सहकार चळवळीचे उद्दिष्ट आहे. भारताच्या राजकीय स्थित्यंतरामध्ये सहकार चळवळ हि एकमेव अपरिहार्य गोष्ट अंतिमतः भारताला सामर्थ्यशाली बनविण्यास कारणीभूत ठरणार आहे. सहकारी संस्थाच समाजाला नवे नेतृत्व व दिशा देणार आहे.
सहकारी व्यवसायातून वाढलेले उत्पन्न शक्य तितक्या जास्त क्षेत्रात वाटले जाते. जेणेकरून खऱ्या अर्थाने समाजवादी समाजरचनेचा उद्देश साध्य होतो. सामान्य कामगारांचा चेहरा डोळ्यासमोर ठेऊन विश्वासाने, सहकाराच्या प्रेरणेतून व आदर्शातून संस्थेने आपल्या सभासदांच्या सेवेची व सामाजिक कार्याची यशस्वी ४३ वर्षे पूर्ण केलेली आहेत.